अनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ म्हणोनी सांभाळ करी माझा ॥
तुज जैसा नाही देव त्रिभुवनी म्हणोनी चरणी मी नटलो ॥१॥
बापाजनार्दना कृपा करी मज सांभाळ वचन आपुली ती ॥२॥
एका जनार्दनी भेट देई देवा संतापायी भावा मिठी पडो ॥३॥