अमृताची गोडी तुझ्या भजनात । नामाचा विसावा दु:खी जीवनात ॥
भजनी रंगावे जग विसरावे राम नाम घ्यावे चिपळ्याची साथ ॥१॥
माझा पांडूरंग ऐकतो अभंग, भक्तिरंगे दंग नाचे किती नात ॥२॥
नाम तुझ देवा केशवा माधवा । कोण देई देवा गोडवा तयात ॥३॥