आपुलिय बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची ॥
काय म्या पामेर बोलवी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले ॥
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची ॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कला वागवी पांगुळा पायावीण ॥