ओंकार स्वरुप गणेशाचे रुप हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।
आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेश ऐसे जाण ॥१॥
ऐसे तिन्ही देव गणेश उत्पति तो हा गणपति मायबाप ।
तुका म्हणे वेद बोलिले पुराणी घ्यावे ओळखोनी व्यासांचे या ॥२॥