विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा । निवृत्ती हा खांद्या वरी सोपाना हात धरी । पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताबाई ही सुंदर गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी । बंका कडीयेवरी, नामा करांगुळी धरी । जनी म्हणे रे गोपाळा, करी भक्तांचा सोहाळा ॥