रामकृष्ण गोविंद नारायण हरी । केशव मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग । लक्ष्मी निवासा पाहे दीनबंधू, तुझे लागे छंदू सदा मज । तुझे नामी प्रेम देई अखंडीत नेणे जप तप दान काही । तुका म्हणे माझे हेची गा मागणे, अखंड हे गाणे नाम तुझे ॥