मनासी लावावी स्वरुपाची गोडी, ईतर आवडी सोडवावी । पदोपदी नाम विठोबाचे घ्यावे कोठेही नसावी आसक्ती ही ॥ अहंकारादी वैरी हे सकल, गुरुकृपा मुळे आवरावे । तुका म्हणे मन उफराटे होय, तरी हे उपाय उणे होती ॥ मनासी लावावी ॥