अमृताहूनी गोड नाम तुझे देवा । मन माझे केशवा का बा न घे ॥धृ॥
सांग पंढरीराया काय करु यासी । का रूप ध्यानासी न ये तुझे ॥१॥
किर्तनी बैसता नीद्र नागविले । मन माझे गुंतले विषय सुखे ॥२॥
हरिदास गर्जती हरी नामाच्या किर्ती । नये मज चित्ती नामा म्हणे ॥३॥
*