HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर गौरीनंदना विघ्ननाशना नम मानसगीत सरोवर वक्रतुंड एकदंत श्रीगजानना
मानसगीत सरोवर - धावे , पावे , यावे लंबोदर...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
गणपतीचे गाणे

धावे, पावे, यावे लंबोदरा ॥

गजानन मोरेश्वरा ॥धृ०॥

वामाकांवरी ब्रह्मकुमारी ॥

दक्षिणेसी शारदा नारी ॥

ऋद्धी सिद्धी वसती शेजारी ॥

मस्तकी दूर्वांकुर ॥ शोभती ० ॥धावे०॥१॥

सर्वांगी शेंदूर चंदनाची उटी ॥

पिवळा पीतांबर सुमनाची दाटी ॥

दक्षिण करि घेशी मोदकांची वाटी ॥

बैससी मूषकावर ॥

मोरया तू बैससी मूषकावर ॥धावे०॥२॥

हे मन रमले गजानन पायी ॥

पदि लीन झाली ही कृष्णाबाई ॥

गौरिकुमारा मति मज देई ॥

करि साह्य निरंतर ॥धावे०॥३॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-30T02:09:47.1812128Z

Comments | अभिप्राय