HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर कृष्णरावाची खालि समाधी ॥ मानसगीत सरोवर श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म
मानसगीत सरोवर - जय जय श्री गुरुदत्ता ॥ ...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
दत्ताचे गाणे

जय जय श्री गुरुदत्ता ॥

तुजवाचुनि मजला कोणी न त्राता ॥जय०॥धृ०॥

काय करू समजेना ॥ भवपुरितुनि कशि सुटू हे उमजेना ॥

हे मन भजन भजेना ॥ माझे म्हणुनी धावते विषय त्यजीना ॥

नामामृत पाजी पान्हा ॥ मी चातक तू मेघ अत्रिनंदना जय०॥१॥

तोषविले स्वजनासी ॥ नाही शांती क्षमा दया मनासी ॥

केवळ पातकराशी ॥ धक्का लाविला माउलीउदरकमळासी ॥

अत्रिसुता तेजोराशी ॥ सोडी अनुसूयानंदना भवाब्धीसी ॥जय०॥२॥

मी वत्स तू धेनू दत्ता ॥ मी पाडस तू हरिणी भासे मम चित्ता ॥

मी बालक तू माता ॥ नाही तुजसम त्रिभुवन शोधुनि पहाता ॥

थकली श्रुति वेद गाता ॥ तेथे काय ही कृष्णा गाईल गाथा ॥जय०॥३॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-30T02:14:27.4542256Z

Comments | अभिप्राय