HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर येतो आम्ही लोभ असू दे ॥ मानसगीत सरोवर धांव धांव आता शीघ्र विठ्ठ
मानसगीत सरोवर - सयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
विठोबाचे गाणे

सयांनो पंढरपुरि जाऊ ॥

एक विटेवरि ब्रह्म उभे ते पांडुरंग पाहू ॥धृ०॥

बरोबर साधुसंत घेऊ ॥

दिंडिपताका टाळ मृदंगा बजन मेळि गाऊ ॥

रजतम विविध तप धूऊं ॥

चंद्रभागेमधि स्नान करूनी आनंदित होऊ ॥सयांनो०॥१॥

पुजेची सामुग्री घेऊ ॥

पंचामृतादी पुजा करूनी तुलसि बुका वाहू ॥

मधुर मिष्ट पक्वान्ने करवू ॥

भक्तिभावे ताटि रुप्याच्या नैवेद्या दावू ॥

त्रयोदशगुणि तांबुल ठेऊ ॥

प्रदक्षिणा दक्षिणा नमूनी पुष्पांजलि वाहू ॥सयांनो०॥२॥

करूनि जननि-तात-सेवा ॥

पुंडलिकाने विधान अणिले परब्रह्म मेवा ॥

त्यजूनि वैकुंठ गावा ॥

भक्तासाठी सत्वर आले ऐकुनिया धावा ॥

भुले हा बघुनि भक्तभावा ॥

युगे अठ्ठाविस खालि बसेना झाले श्रम देवा ॥

सदा दे संतसंग बरवा ॥

म्हणते कृष्णा नलगे मुक्ती चरणि ठाव द्यावा ॥सयांनो०॥३॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T01:51:20.4011808Z

Comments | अभिप्राय