HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर सयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए मानसगीत सरोवर चला जाउ पाहु तया चला जाउ
मानसगीत सरोवर - धांव धांव आता शीघ्र विठ्ठ...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
विठोबाचे गाणे

धांव धांव आता शीघ्र विठ्ठला ॥

तुजवाचुनि जगति नसे अन्य हरि मला ॥ प्रभो अ० ॥धृ०॥

मधुर सगुण नाम असे ॥

गाति भक्त प्रेम-रसे ॥

पुंडलिके भावे कसे विटे स्थिराविला ॥प्रभो० ॥धाव॥१॥

अगणित मुनि ध्याति तुजसि ॥

परि नच त्या नयनि दिससि ॥

जनिसंगे दळण दळिसि ॥

भक्ति भाळला ॥प्रभो०॥धाव२॥

अंत किती बघसि अजुनि ॥ समय कठिण जाण मनी ॥

होइल तव सत्वहानी ॥ तारि कृष्णेला ॥ प्रभो०॥धाव॥३॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T01:52:20.5476672Z

Comments | अभिप्राय