HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर ये धावत माय विठाई ॥ दास मानसगीत सरोवर धन्य झालि शबरतनया ॥ धन्
मानसगीत सरोवर - भीमातटिची माय विठाई ॥ ए...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
विठोबाचे गाणे

भीमातटिची माय विठाई ॥

एक विटेवरी तिष्ठत राही ॥ भीमा ॥धृ०॥

किति कनवाळू पूर्ण दयाळू ॥

या मायेते आप-पर नाही ॥भी०॥१॥

जनाबाइचे दळण दळूनी ॥

चंद्रभागेतटि लुगडी धूवी ॥भीमा०॥२॥

सखूबाइची सवत जाहली ॥

पतिसेवेसी तत्पर राही ॥भीमा०॥३॥

नाथासंगे पाणि वाहिले ॥

कावड स्कंधी घेउन जाई ॥भीमा०॥४॥

अंत नको मम पाहू आता ॥

हे जगजननी नमि कृष्णा ही ॥ भीमा०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T01:59:20.2712000Z

Comments | अभिप्राय