HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर भीमातटिची माय विठाई ॥ ए मानसगीत सरोवर महिरावण कांता बोले ॥
मानसगीत सरोवर - धन्य झालि शबरतनया ॥ धन्...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
शबरीचे गाणे

धन्य झालि शबरतनया ॥

धन्य झालि शबरतनया ॥

दिधलि भेट रामराया ॥धृ०॥

बहुत दीन तप केले ॥

मुनिजात जेथे रमले ॥

रघुराज घरा आले ॥

उद्धरिली पापिजाया ॥धन्य०॥१॥

रामचरणि करुनि पूजन ॥

भक्तिभावे करुनि सू-मन ॥

म्हणे दिवस धन्य धन्य ॥

पुनित झालि आत्मकाया ॥ धन्य०॥२॥

पुण्यवान तरुवर ॥

बदरिफळे असति मधुर ॥

भक्षावी ही रघुवीर ॥

मी-तूपणा सांडुनिया ॥धन्य०॥३॥

बदरिफळे घेउनि करी ॥

मधुर बोले धनुर्धारी ॥

चंचुपुटे काय शबरी ॥

भक्षिली हि पक्षिया ॥धन्य०॥४॥

शुद्ध दंति चाखुनिया ॥

रक्षिली मि आजवरी ॥

घालि मुखी रावणारी ॥

शबरिभाव पाहुनिया ॥धन्य०॥५॥

भक्त भिल्लि उद्धरिली ॥

सुरी पुष्पवृष्टि केली ॥

नामामृता कृष्णा प्याली ॥

नमन करी रामपाया ॥धन्य०॥६॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:00:47.7569984Z

Comments | अभिप्राय