HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर श्री वसिष्ठ गुरुची आज्ञा मानसगीत सरोवर सांग कुठे प्राणपती मजसि म
मानसगीत सरोवर - जो जो रे जो जो श्रीरामचंद...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
रामाचा पाळणा

जो जो रे जो जो श्रीरामचंद्रा ॥

दशरथपूत्रा लागो नीद्रा ॥ जो जो०॥धृ०॥

केवळ कांचनी पाळणा आणिला ॥

बा तूजसाठी रेशमी विणिला ॥

जो जो रे जो जो० ॥१॥

खूर रुप्याचे चहु बाजूंना ॥

हंतरिलासे आत बिछाना ॥जो जो० ॥२॥

भरजरि चांदवा रेशमी शेला ॥

चिमण्या-मोत्यांची झालर त्याला ॥जो जो० ॥३॥

हंस कोकिळ ते इंद्रनिळाचे ॥

बसविले शुक मोर पाचपोवळ्याचे ॥जो जो० ॥४॥

हालवी कौसल्या दशरथ बाळा ॥

वंदिते कृष्णा त्या विश्वपाळा ॥जो जो०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:11:32.3939408Z

Comments | अभिप्राय