HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर कुणाचा तू अससि दूत कोण धन मानसगीत सरोवर श्रीरामाचे अन हित चिंती
मानसगीत सरोवर - जा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
लक्ष्मण शक्ति

जा झडकरी बा बलभीमा ये घेऊनि गिरि द्रोणाते ॥धृ०॥

नावरे दुःख राम ते शिर अंकी घेउनि बोले ॥

अजपासुनि समरंगणिचे मम साह्यचि हरपुनि गेले ॥

निर्वाण शक्ति सोडुनिया दशकंठे निधान नेले ॥चाल॥

नको अंत पाहु हनुमंता ॥ जिवदान देई बलवंता ॥

वाचवी उर्मिळा कांता ॥ साठवी पदरि पुण्यात ॥जा०॥१॥

चतुर्दशवर्ष निरहारी मजसाठी बालक दमले ॥

सीतेसह मज तोषविता, बहु शरीर याचे श्रमले ॥

जाणुनिया भविष्य पुढचे एकवार नाही पुसले ॥चाल॥

वीटंबुनि शूर्पनखेसी ॥ तू वधिले इंद्रजितासी ॥

तू वरिले सत्कीर्तीसी ॥ तोषविले सकळ सुराते ॥जा०॥२॥

तेहतीस कोटि सुरांना कसे बंध मुक्त करू आता ॥

मी नंदिग्रामी जाता मज पसेल भरतहि भ्राता ॥

त्या ऊर्मिळा वहिनीते कशि सांगु ओखटी वार्ता ॥चाल॥

घडिभरि तरी का नच वदसी ॥ सुमित्रा पुसेल मजसी ॥

कथु काय वृत्त हे तिजसी ॥ अल मूर्च्छा रघुवीराते ॥जा०॥

नको धैर्य टाकु श्रीरामा द्रोणाचल अणितो आता ॥

मज निमित्त मात्र करूनी राघवा सर्व तू कर्ता ॥

बोलुनिया मारुति उठला तिन घटिका यामिनि उरता ॥चाल॥

या वेळे चल गिरि द्रोणा ॥ दे रामानुज जिवदाना ॥

तोषवी जानकी रमणा ॥ येउई मिळवि कीर्ती ॥जा०॥४॥

मर्कटा येसि कितीदा मदवाही गिरिवर झाला ॥

नायके अचल हा म्हणुनी स्कंधावरि धरिला त्याला ॥

झेलिता कंदुका ऐसा कपि म्हणती सूर्य उदेला ॥चाल॥

म्हणे सुषेण सुत पवनाचा ॥ आणितो अचल हा साचा ॥

वाचला जीव शेषाचा ॥ ही कृष्णा नमिते त्याते ॥जा०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:15:47.2403920Z

Comments | अभिप्राय