HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर कौसल्या विनवि श्रीरामा नक मानसगीत सरोवर सकुमार वनी धाडु नको श्रीर
मानसगीत सरोवर - दुष्ट ही कैकयी कारण झाली ...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
रामावे गाणे

दुष्ट ही कैकयी कारण झाली गोवूनी पतिवचना ॥

बाइ माझा रघुवीर जातो वना ॥

रघुवीर जातो वना, आज माझा रघु० ॥धृ०॥१॥

भरजरी पीतांबर सोडुन ती ॥

काढूनी घे भूषणा ॥ बाइ०॥२॥

सर्वांगासी चर्चुनी विभुती ॥

चंदनउटि लावीना ॥बाइ०॥३॥

जनकसुतेसी रथि बैसवितो ॥

संगे घे लक्ष्मणा ॥बाइ०॥४॥

साखर केशर घालुनि आता ॥

देऊ मी दूध कुणा ॥बाइ०॥५॥

या भवडोही दुःखित कृष्णा ॥

सोडवी रघुनंदना ॥बाइ०॥६॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:19:21.5986240Z

Comments | अभिप्राय