HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर दुष्ट ही कैकयी कारण झाली मानसगीत सरोवर कौसल्या विनवि जना ॥ झणी
मानसगीत सरोवर - सकुमार वनी धाडु नको श्रीर...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
रामावे गाणे

सकुमार वनी धाडु नको श्रीराम ॥धृ०॥

पृथ्वि-पती मी स्त्री-लोभाने घालविला भगवान ॥स०॥१॥

सतत तुझ्या गे लाविन सेवे, देइ मला जिवदन ॥स०॥२॥

राज्यी स्थापिन भरत तुझा गे, घे रामाची आण ॥स०॥३॥

भरजरि पीतांबर सोडुनिया, करि वल्कल परिधान ॥स०॥४॥

राम-लक्ष्मण रथि बैसवुनिया, जनक-सुता गुणवान ॥स०॥५॥

खचित खरी तू निर्दय कैकई, केवळ पातक खाण ॥स०६॥

वेष्टिलि कृष्णा षट् शत्रूंनी, पाहु नको निर्वाण ॥स०॥७॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:20:28.5248592Z

Comments | अभिप्राय