HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर सकुमार वनी धाडु नको श्रीर मानसगीत सरोवर घ्या घ्या घ्या घ्या
मानसगीत सरोवर - कौसल्या विनवि जना ॥ झणी ...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
रामावे गाणे

कौसल्या विनवि जना ॥ झणी घेउन या रामा ॥धृ०॥

दूध कुणा देवू ॥ गंध कुणा लावू ॥

कवणाते मी भरवू ॥ मन्मनविश्रामा ॥ कौ०॥१॥

मधुर सुवासाचे उदक तुला कैचे ॥

मोडतिरे बाभळिचे कंटक पदपद्मा ॥कौ०॥२॥

किरिट काय केला, वल्कले का तुजला ॥

कैकइच्या वचनाला पाळिसि घनशामा ॥कौ०॥३॥

रथ धाडुन त्याला, अणवा मम बाळा ॥

कृष्णेच्या मनि बसला रामनाम प्रेमा ॥कौ०॥४॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:21:31.9961264Z

Comments | अभिप्राय