HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर घ्या घ्या घ्या घ्या मानसगीत सरोवर कीर्तनी स्मरणी अर्चनी भाव
मानसगीत सरोवर - रामनाम बहु गार मनूजा रामन...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
रामावे गाणे

रामनाम बहु गार मनूजा रामनाम बहु गार ॥धृ०॥

अगणित पापे करुनी वाल्मिक नामे झाला पार ॥मनूजा ॥राम०॥१॥

अंती स्मरता अजामीळ तो होउनि गेला स्वार ॥मनूजा॥राम०॥२॥

चंद्रमौलिने ग्रंथ वाटिला कंठी धरिले सार ॥मनूजा॥राम०॥३॥

नामप्रतापे हनुमंताने केला वनि संहार ॥मनूजा॥राम०॥४॥

रामनाम पी मधुर सुधारस दे सोडुन संसार ॥मनूजा॥राम०॥५॥

गुरुचरणांबुजि रत दिन-रजनी नमिते कृष्णा नार ॥मनूजा॥राम०॥६॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:23:50.0746736Z

Comments | अभिप्राय