HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर रामनाम बहु गार मनूजा रामन मानसगीत सरोवर राम पदी धरि आस मनूजा ॥र
मानसगीत सरोवर - कीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
रामावे गाणे

कीर्तनी स्मरणी अर्चनी भावे ॥ रघुवीरा भजे ॥धृ०॥

क्षणभंगुरतनु क्षणिक सुखी ह्या भुलुनि म्हणसि का माझे माझे ॥रघु०॥१॥

बुडसी वृथा का भवसागरि ह्या, धन सुत स्त्रीचे वाहसी ओझे ॥रघु०॥२॥

बघुनि अशा ह्या श्यामस्वरूपा, तन मन अर्पुनी चरणी लागे ॥रघु०॥३॥

हलाहल शीतल झाले शिवाचे, कंठी भूषण सुंदर साजे ॥रघु०॥४॥

गुरुपदी भावे शिर वाहुनि हे, कृष्णा रामा नामी गाजे ॥रघु०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:24:59.3042208Z

Comments | अभिप्राय