HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर कीर्तनी स्मरणी अर्चनी भाव मानसगीत सरोवर सदोदित रामपदी राही ॥ रा
मानसगीत सरोवर - राम -पदी धरि आस मनूजा ॥र...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
रामावे गाणे

राम-पदी धरि आस मनूजा ॥रा०॥धृ०॥

क्षणभंगुर ही धन-सुता-दारा मोहुन पाडिति खास ॥मनूजा ॥रा०॥१॥

पंच विषय षट् शत्रु जिंकुनी चुकवी अपुला त्रास ॥ मनूजा॥राम०॥२॥

प्रभु निज भक्ता सांभाळी तो बांधुनिया दृढ कास ॥मनूजा॥राम०॥३॥

सद्गुरुवाक्ये मार्ग शोधुनी ब्रह्मपुरी कर वास ॥मनूजा॥राम०॥४॥

ध्वज-वज्रांकुश-चापशरकरा नमिते कृष्णा त्यास ॥मनूजा॥राम०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:26:07.9329040Z

Comments | अभिप्राय