HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर घडि घडि रघुवीर दिसतो मला मानसगीत सरोवर रामनाम भजन करी सतत मानवा
मानसगीत सरोवर - ये धावत रामा ॥ वसे मम ह्...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
रामावे गाणे

ये धावत रामा ॥ वसे मम ह्रदयी विश्रामा ॥

शरयू तिरि तव वास निरंतर अयोध्या ग्रामा ॥

ध्वज वज्रांकुश चाप शर करी, सन्मुख बलभीमा ॥वसे०॥१॥

कौसल्यासुत, दशरथतनया ॥ करि पावन आम्हा ॥

त्रिवर्ग बंधू सन्निध असती श्री मेघश्यामा ॥वसे०॥२॥

किरिट कुंडले कौस्तुभ साजे शिव घे तव नामा ॥

विशाळ भाळी तिलक कस्तुरी, शोभे सुखधामा ॥वसे०॥३॥

रूप साजिरे, ध्यान गोजिरे मम अंतर्यामा ॥

सतत वसो दे, म्हणते कृष्णा नित्य जडो प्रेमा ॥वसे०॥४॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:31:36.3050800Z

Comments | अभिप्राय