HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर मागू शाश्वत सौभाग्याप्रति मानसगीत सरोवर चला सख्यांनो करविर क्षे
मानसगीत सरोवर - शुक्ल अश्विन अष्टमिरात्री...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
महालक्ष्मीचे गाणे

शुक्ल अश्विन अष्टमिरात्री ॥ धाडिते मना करवीरी ॥

त्यासंगे सिंधुकुमारी ॥ मम सदना ये लौकरी ॥

तव उत्सव करिन मि भारी ॥ नव विधा भक्ति उपचारी ॥चाल॥

ही षोडश परिचीपत्री ॥ हा तंतू षोडशपदरी ॥

घालूनि स्नान अति अदरी ॥ नैवेद्य षड्रसा दावी ॥

श्रीमहालक्ष्मि देवी ॥ मज सौख्यानंदा दावी ॥धृ०॥१॥

कर्पूर उजळिते अरती ॥ म्या ज्ञान लाविल्या वाती ॥

पुष्पांजळि घेऊन हाती ॥ प्रार्थना ऐक मम पुरती ॥चाल॥

तुजजवळि घंटा फुंकोनी ॥ चौप्रहर रात्रि क्रमवोनी॥

तोषविते तुजला जननी ॥ मम इच्छा त्वा पुरवावी ॥श्री०॥२॥

रुणझुणती नेपुर चरणी ॥ शोभते लाल पैठणी ॥

जरिकांठि चोळि घालोनी ॥ रत्‍नजडित फुलांची वेणी ॥

तनु शोभवि शृंगारांनी ॥ इंदिरा हरी मनरमणी ॥चाल॥

तू होसि प्रथम कुमारी ॥ युवती ही दुसर्‍या प्रहरी ॥

तिसर्‍यात वृद्ध हो नारी ॥ चवथ्यात करविरी जावी ॥श्री०॥३॥

तू पतितपावनी माते ॥ किति वर्णू तव ध्यानाते ॥

परि अपुल्या उद्धाराते ॥ तव गुणानुवाद मि गाते ॥

मज तारि तारि दीनाते ॥ धरि कवटाळुनि बाळाते ॥चाल॥

करि सकळ स्त्रिया सौभाग्या ॥ दे सतत तया आरोग्या ॥

तव गीत गात वैराग्या ॥ पदि तुझिया कृष्णा वसवी ॥श्री०॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:38:04.8037136Z

Comments | अभिप्राय