HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर काय सांगू यशोदे ग करितो ख मानसगीत सरोवर आता ऊठ वेगे हरी उदय झाला
मानसगीत सरोवर - यशोदा काकू हो राखावी गोडी...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
गार्‍हाणे

यशोदा काकू हो राखावी गोडी ॥

तुमच्या मुलामुळे करू आम्ही तोडी ॥धृ०॥

दूध विकावया मथुरेसी जाता ॥

मारितो खडे हा मम प्राणनाथा ॥य०॥१॥

सात मासांचा बालक माझा ॥

तुम्हि बारा घरच्या बालट बाजा ॥य०॥२॥

दुसरी म्हणे मम बालक तान्हे ॥

आणून ठेवीले बिदिवरि याने ॥य०॥३॥

सांगता चाड्या असती ह्या खोट्या ॥

मम तान्हे लेकरू तुम्हि नाल मोठ्या ॥य०॥४॥

हा गोपाळ असुरांचा काळ ॥

तुज वाटे बाळ हा असे खोडाळ ॥य०॥५॥

धन्य गोपीका यशोदा तो नंद ॥

दिनरजनि कृष्णेसि श्रीकृष्णछंद ॥य०॥६॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:54:34.0962464Z

Comments | अभिप्राय