HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर गोपीनाथा आले आले सारू मानसगीत सरोवर मनमोहना श्रीरंगा हरी था
मानसगीत सरोवर - हरि रे तुझी मुरलि किती गु...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
कृष्णाची मुरली

हरि रे तुझी मुरलि किती गुलजार ॥धृ०॥

पाका करिता पळत मि सुटले टाकुनि उघडे द्वार ॥ह०॥१॥

न्हाणित नाहता धावत आले पाठिवरी कुंतलभार ॥ह०॥२॥

तान्हयास मी ढकलुनि दिधले भांबवि तो नंदकुमार ॥ह०॥३॥

शुक बक मैना वृक्षि स्थिरावली मुरलिरव अनिवार ॥ह०॥४॥

ऐशा कृष्णापदि कृष्णा ही मागतसे आधार ॥ह०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:00:05.3225264Z

Comments | अभिप्राय