HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर हरि रे तुझी मुरलि किती गु मानसगीत सरोवर हो रात्री कोठे होता चक्रप
मानसगीत सरोवर - मनमोहना श्रीरंगा हरी , था...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
कृष्णाची मुरली

मनमोहना श्रीरंगा हरी, थांबवि मुरली जरा ॥

पाक करिता उठले ॥ देहभान खुटले ॥

संसारावरि विटले ॥

टाकुनि आले घरा ॥ मन०॥१॥

बहुत नवसि कृष्णा ॥

झाला मज तान्हा ॥

पाजविता त्या पान्हा ॥

ऐकिले मधुर स्वरा ॥मन०॥२॥

दधि मंथन करिता नाद भरे चित्ता ॥

रविदोरा त्यागिता ॥

सुटला तक्रझरा ॥मन०॥३॥

व्रजवासी ललना ॥

प्रार्थिति मन-मोहना ॥

मागतसे तुज कृष्णा ॥

दे पदि ठाव सदा ॥मन०॥४॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:01:20.1801664Z

Comments | अभिप्राय