HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर अक्रूरा नेउ नको राम श्री मानसगीत सरोवर उद्धवास क्षेम पुसे यशोदा
मानसगीत सरोवर - जातो मथुरेला हरि हा टाकुन...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
मथुरा गमन

जातो मथुरेला हरि हा टाकुनि आम्हाला ॥

नंद यशोदेला हरी०॥धृ०॥

गडे नंदाच्या द्वारी जुंपुनि रथ सिद्धचि झाला ॥

दधि करकमळी घालुनि माता बोळविते त्याला ॥

चलागे अडवू कृष्णाला ॥जातो०॥१॥

नंद यशोदा अकांत करिती मारुन मिठि हरिला ॥

नेत्री अंजन घालुनि लावित गालबोट गाला ॥चला०॥जातो०॥२॥

घातकि अमुचा मथुराधिपती नेतो या बाला ॥

काठि, कांबळा, घुंगुर, वाहणा हरि त्यागुन गेला ॥चला०॥जातो०॥३॥

कासे पितांबर मुगुट कुंडले कौस्तुभ वनमाला ॥

करि कर धरूनी रथि बैसवितो अक्रुर हा मेला ॥चला०॥जातो०॥४॥

व्रजांगना त्या नंदअंगणी अडविति कृष्णाला ॥

मम ह्रदयांतरि बैसे क्षणतरि नमि कृष्णा हरिला ॥चला०॥जातो०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:05:21.6173360Z

Comments | अभिप्राय