HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर अंत नको पाहु अता धाव माधव मानसगीत सरोवर कुसुम स्वर्गिचे नारद हरि
मानसगीत सरोवर - प्रिये तू ह्या समयि शय्या...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
पारिजातक

प्रिये तू ह्या समयि शय्या त्यजूनीया ॥

रुसुन बसलीस का वाया महीवरि या ॥प्रि०॥धृ०॥

इंदुवदने कमलनयने धवल सुमने ॥

नसति वेणीत का वससी त्यजूनीया ॥प्रि०॥१॥

पुरे प्रेमा कळे आम्हा वदे भामा ॥

सुमन सवतीस देउनीया आला धामा ॥प्रि०॥२॥

रुचिरजाये आलिंगुनीया यादवराया ॥

म्हणत लावीन तरूवर तो आणूनीया ॥प्रि०॥३॥

धरुनि गाला हसवि तिजला तांबुलाला ॥

देउन, बसवीत भामेला धरूनीया ॥प्रि०॥४॥

विश्वनाथा कृपावंता हरी चिंता ॥

नमित कृष्णा निरंतरही प्रभूपाया ॥प्रि०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:11:20.2730576Z

Comments | अभिप्राय