HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर ऋतुस्नान मंदिरात एकटी असे मानसगीत सरोवर रुक्मिणिकांता धाव अकांता
मानसगीत सरोवर - कशि तुजला झोप आली हे न कळ...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
दौपदीचा धावा

कशि तुजला झोप आली हे न कळे हो मला ॥धृ०॥

धरुनीया केश माझे सभेमाजी ओढितो ॥

ओढुनिया पल्लवासी कर वसना सोडितो ॥

वाग्बाणा सोडुनीया मम ह्रदया भेदितो ॥चाल॥

द्रौपदी बैस येउनी लाज सांडुनी मांडिवरि झणी, ऐक गोपाला ॥हे न क०॥१॥

धरूनीया मौन सारे सभेमाजी बैसले ॥

कृपद्रोण विदुर यांचे या समयी न चले ॥

जंबूके पाच व्याघ्रा कपटाने जिंकिले ॥चाल॥

केसरी द्यूत पंजरी कोंडिले, हरी काय करु तरी, रक्षि आम्हाला ॥हे न क०॥२॥

रुक्मिणीवहिनि तुझ्या पदकमला वंदिते ॥

नको पाहू अंत माझा धाडुनि दे स्वामिते ॥

तो दीननाथ आता हरि आधीसिंधुते ॥चाल॥

श्रीधरे शब्द ऐकिले. शयन त्यागिले, आलिंगन दिले, येउन भगिनीला ॥हे न क०॥३॥

का भीशी दुपदबाळे तव पाठी राहतो ॥

नको चिंता वसन भारे तव काया झाकितो ॥

शत्रूंच्या गर्वभंगा करुनीया टाकितो ॥चाल॥

पाहुनी सुदर्शनकरा, नमे सुरवरा, प्रार्थि श्रीधरा ॥ रक्षि कृष्णेला ॥हे न क०॥४॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:18:03.9735504Z

Comments | अभिप्राय