HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर दिनराति न ये मज निद्रा घे मानसगीत सरोवर मी मी मी मी मी मी झणी
मानसगीत सरोवर - आरती श्री गुरुराया ॥ उज...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
आरती गुरूची

आरती श्री गुरुराया ॥

उजळू तन मन अर्पुनि पाया ॥आ०॥धृ०॥

औट हाताचे तबक देहाचे ॥

पंचप्राण हे दीपक साचे ॥

शांती घृत घालुनिया आत्मज्योति म्या दिलि लाउनिया ॥आ०॥१॥

काम क्रोध ते जाळुनी आधी ॥

पाद्योदकाची केली सिद्धी ॥

प्रक्षालिन तव पाया ॥

मायांबर हे देते पुसाया ॥आ०॥२॥

सद्भक्तीची पक्वान्ने केली ॥

निजबोध ताटी नैवेद्या आणिली ॥

भक्षावी बघुनि दीना ह्या ॥

प्रार्थी कृष्णा उद्धारुनि न्या ॥आ०॥३॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:29:03.1213584Z

Comments | अभिप्राय