HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर आरती श्री गुरुराया ॥ उज मानसगीत सरोवर होइ मना तू स्थीर जरा तरि
मानसगीत सरोवर - मी मी मी , मी मी मी , झणी...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
बोधविषयक गाणे

मी मी मी, मी मी मी, झणी दे, सोडुनि मनुजा ॥धृ०॥

हा माझा वाडा, हा माझा घोडा, मम पदिंचा हा जोडा, वमनासम समजा ॥मी०॥१॥

ही माझी कांता, मम धन सुत दुहिता, मी शाहाणा, अति ज्ञाता मानु नको मनुजा ॥मी०॥२॥

हे माझे व्याही, हे मम जावई, काळ उणा ज्या समयी, कोणि न ये काजा ॥ मी०॥३॥

हे सर्वचि माझे, म्हणता यमराजे, नेतिल रे झणि उमजे, त्यागी तव गमजा ॥मी०॥४॥

श्रीगुरूची वाणी, धरि कृष्णा स्वमनी, परब्रह्मावाचूनि ॥ भाव नसे दूजा ॥मी०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:30:09.9574640Z

Comments | अभिप्राय