HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर मी मी मी मी मी मी झणी मानसगीत सरोवर शांत दांत चपल मना होइ झडक
मानसगीत सरोवर - होइ मना तू स्थीर जरा तरि ...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
बोधविषयक गाणे

होइ मना तू स्थीर जरा तरि चपल मना धरि धीर ॥धृ०॥

कर्ता हर्ता तो जग-त्राता, एक असे रघुवीर ॥ जरा तरि०॥१॥

धावु नको तू पवना ऐसे ह्रदयी राहे स्थीर ॥जरा०॥२॥

ऐकुन श्रवणी पाहुन नयनी, रसने राखी स्थीर ॥जरा०॥३॥

ह्या देहावरि संकट पडता, रक्षिल तो यदुवीर ॥जरा०॥४॥

भगवद्भजनी काल क्रमोनी, झिजवी तव हे शरीर ॥जरा०॥५॥

म्हणे कृष्णा हो रत गुरुपायी, का करितेस उशीर ॥जरा०॥६॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:31:20.6591280Z

Comments | अभिप्राय