HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर होइ मना तू स्थीर जरा तरि मानसगीत सरोवर औट हाती दश द्वारांच्या आत
मानसगीत सरोवर - शांत दांत चपल मना होइ झडक...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
बोध विषयक गाणे

शांत दांत चपल मना होइ झडकरी ॥

त्यजुनि सकल मोहपाश भजे श्री हरी ॥धृ०॥

मृत्तिकेच्या मंदिरासि काय करिसि तू ॥

अंतसमयि कोण मना सांग स्मरसि तू ॥

अग्निसंगे भस्म होइ जासि यमपुरी ॥शांत०॥१॥

मन्मथासि आवरुनी होइ तू भले ॥

धन, कन्या पुत्र जरी आजि साधले ॥

परिणामी कोणि न ये जाण अंतरि ॥शांत०॥२॥

राखि धैर्य तशी जवळ सतत शांति ते ॥

सुह्रद करी बोध-भाव विवेकसहित ते ॥

काम क्रोध श्रेष्ठ रिपू आधि संहरी ॥शांत०॥३॥

वासनेसि कल्पनेसि घालि बाहेरी ॥

उपरतीसि ठाव देइ आत्ममंदिरी ॥

मद-मत्सर थोर अरी त्यागि लवकरी ॥शांत०॥४॥

कृष्णेने गुरुवचनी भाव ठेविला ॥

पंचप्राणसहितचि त्या देह वाहिला ॥

दाखवि मज मार्ग सुलभ आस करि पुरी ॥शांत०॥५॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:32:05.4535392Z

Comments | अभिप्राय