HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर बुद्धि माता शिकवी मना स मानसगीत सरोवर अजुनि तारि नरा करी सुविचा
मानसगीत सरोवर - मधुर मधुर हरिनाम सुधारस प...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
बोधविषयक गाणे

मधुर मधुर हरिनाम सुधारस प्राशी मानवा, झडकरि प्राशी मा० ॥धृ०॥

झर झर झर झर आयुष्य सरते, कर कर कर कर सार्थक पुरते ॥

धर धर धर धर हरिपद दृढ ते, त्यागुन तू भवा ॥झ०त्या०॥मधु०॥१॥

औषध दुसरे घेउ नको तु ॥

त्यागुनिया षड्‌विकार किंतू ॥

विकल्प येता गुण न परंतु ॥

नरकी रौरवा, जाशिल न०॥मधु०॥२॥

नारदमुखिंचा प्राशुनि वाल्हा ॥

निशिदिनि जपता पावन झाला ॥

अवताराच्या वदे चरिताला ॥

विलंब राघवा जरि असे, वि०॥मधु०॥३॥

प्राशियले विष निलकंठाने ॥

शीत होय परि हरिनामाने ॥

म्हणते कृष्ण अति प्रेमाने ॥

तारी बहु जिवा रस हा, तारी बहु०॥४॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T03:41:23.7363104Z

Comments | अभिप्राय