HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी मोरया मोरया हो मोरया मोरय मोरया गोसावी गणराज दयाळा बा दाखवी चरण
मोरया गोसावी - पाहतां त्रीभूवनी हो दुजा ...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



30GOOG
॥ पद ६ ॥

पाहतां त्रीभूवनी हो दुजा न देखो नयनी ॥

एका मोरया वाचूनि हो मोक्षदाता ॥१॥

येई तूं मोरया हो त्रयलोक्य वीसावया ॥

जडजीव तारावया हो तूंचि एक ॥२॥

आकळु नकळु बा आहेसी सत्यलोकी ॥

नवल अवतार मृत्युलोकीं त्वां धरीयेला ॥३॥

मूषक वाहन हो देव देखिलें गहन ॥

महाविघ्नवीध्वंसन हो गणराज ॥४॥

परशु अंकुश करी बा घेउनिया झडकरी ॥

आपुले ब्रीद साच करी हो गणराज ॥५॥

मोरया गोसावी हो देव योगिया गहन ॥

त्यांचे हृदई संपूर्ण हो नांदतसे ॥६॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-22T21:35:48.1251488-04:00

Comments | अभिप्राय