HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी पाहतां त्रीभूवनी हो दुजा मोरया गोसावी वाट मी पाहातो रे मोरया रे
मोरया गोसावी - गणराज दयाळा बा दाखवी चरण ...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



45GOOG
॥ पद ७ ॥

गणराज दयाळा बा दाखवी चरण ॥

माझे भूकेले लोचन हो पाहावयासी ॥१॥

धेनू जाय वना बा वाट पाहे वत्स सदना ॥

तैसि गत माझ्या मना हो झाली असे ॥२॥

आजुनि कां न येसी बा सखया गणराजा ॥

कवण्या भक्ताच्या बा काजा हो गुंतलासी ॥३॥

दूर धरिसी मजसी आठवावे कवणासी ॥

मिठी मारली चरणासी (पायासी) हो दृढभावे ॥४॥

विनवावे तुज किती बा सखया मंगलमुर्ति ॥

दीन तुज मी काकुलती येत आहे ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-22T21:36:49.6035504-04:00

Comments | अभिप्राय