HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी गणराज दयाळा बा दाखवी चरण मोरया गोसावी माहेर हो माझे ऐका हो साजण
मोरया गोसावी - वाट मी पाहातो रे मोरया रे...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



45GOOG
॥ पद ८ ॥

वाट मी पाहातो रे मोरया रे तूझी ॥

तुचि विश्रांति रे माझीये मायबापा ॥१॥

तुजवाचोनी सोय रे मज नाहीं रे दुसरी ॥

झणी धरीसी अंतर हो दीन बंधु ॥२॥

भेटि बहू दिवस जाहाले देव कोठे स्थीरावले ॥

वाट पाहातां श्रमले हो नेत्र माझे ॥३॥

चरणी ब्रीदाचा तोडरु रे हा तूझा हो बडिवारु ॥

माझा देह भाव निर्धार हा तुझे पायीं ॥४॥

मोरया गोसावी हो योगिया हो लीन ॥

भेटी दिधली आलिंगूनिया गणराजा ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-22T21:38:07.9462016-04:00

Comments | अभिप्राय