HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी तूझिये भेटिचि बहू आस रे म मोरया गोसावी गणराज चरणीं माझें लुब्धले
मोरया गोसावी - चरणी लाउनी तारी तूं कृपाव...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



30GOOG
॥ पद १४ ॥

चरणी लाउनी तारी तूं कृपावंता रे ॥

जडजीव तूज नेणती सर्वथा ॥

भूमिभार शरीर जाईल वृथा ॥

दिनवत्सल तारीं तूं गणनाथा रे ॥१॥

तूझे निजरुप लक्षिता नयनी ॥

महादोष हरति ततक्षणीं रे ॥

ऋषिमुनि ध्याती तुज लागोनि ॥

तुझें नाम दुर्लभ चिंतामणी रे ॥२॥

तुझ्या चरणीं मज जाला विश्वास ॥

झणी धरशिल मज तूं उदास रे ॥

तुझें नाम ध्यातों अहर्निशी ॥

चुकवि आयागमन तोडि पाश रे ॥३॥

अष्टमा सिद्धि वोळंगती तुझें पासी ॥

तुझा पार तो बा न कळे वेदासि रे ॥

मोरया गोसावी योगि हा पुण्यराशी ॥

नाम संकीर्तन अखंड मानसि हो चरणी ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-22T21:44:51.3262336-04:00

Comments | अभिप्राय