HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी येई तूं धावण्या देवा माझ् मोरया गोसावी पतित पावन सुंदरा ये ये हा
मोरया गोसावी - विश्वरुप सदाशिव ये ये हा ...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



30GOOG
॥ पद २८ ॥

विश्वरुप सदाशिव ये ये हा (देखिले डोळा) ॥

सवे पाळ नीळा नंदी ढवळा ॥

अर्धांगीं बैसली ये ये हा (शैल्यबाळा) ॥

मुगूटी गंगा वाहे झुळझूळा ॥१॥

जय जय शंकर ये ये हा शूळ पाणी ॥

(ब्रह्मादिक) सनकादिक ऊभे कर जोडूनि ॥ध्रु.॥

त्रिपुंड्र टिळकू ये ये हा दिव्य कुंडले ॥

मुख प्रभा कोटी भानु तेज लोपले ॥

अधरा दिप्ति हळ हळ ये ये हा कंठीं मिरवले ॥

वासुकि हार गळा ॥ पदक शोभलें ॥२॥

त्रिशूळ डमरु ये ये हा जटाचा भारु ॥

विभूतिचे उधळण जळा अंधारु ॥

रुंड माळा शोभति ये ये हा सर्प विखारु ॥

अति रुप लावण्य उमा शंकरु ॥३॥

कमंडलू आधारु ये ये हा मेखळा साजे ॥

किर्ती मुख बाह्यवट शोभती भुजे ॥

शृंगिया एक नादें ये ये हां गगन गर्जे ॥

आनंदे ब्रह्मानंदे नाचती भुजे ॥४॥

व्याघ्रांबर परिधान ये ये हा चरणि तोडरु ॥

नूपुरे झणत्कारे गर्जे आंबरु ॥

मोरयागोसावी ये ये हा योगी गंभीर ॥

वरद मूर्ति कृपेनें ध्यानी शंकर ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-22T22:00:00.4534944-04:00

Comments | अभिप्राय