HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी मयुरपूर क्षेत्रीं एक आहे मोरया गोसावी मोरया मोरया मोरया ॥ जप आज
मोरया गोसावी - चला जाऊं मोरेश्वरा ॥ पाहू...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



30GOOG
॥ पद ४६ ॥

चला जाऊं मोरेश्वरा ॥ पाहूं आजि तोची ॥

आह्मी गेलों मोरेश्वरा ॥ पाहूं आजी डोळा ॥१॥

रुप पाहूनी नयनीं ॥ सुख वाटे जीवा ॥

ऐसें रुप तें पाहिलें ॥ धरिलें हृदयीं तेची ॥२॥

काय सांगूं मी ती गोडी ॥ लागे आजी तुझी ॥

बहू वेधू हा लागला ॥ दाखवी चरण (पाय) मज ॥३॥

तुजवीण देव नेणें ॥ जन्मो जन्मीं तोही ॥

कृपा करुनी दिधला ॥ आजि देवराया ॥४॥

मोरया गोसावी दातार ॥ आम्हा देतो वर ॥

म्हणूनियां धावें तेथें ॥ मज आजि तोची ॥५॥

चिंतामणी दास तुझा तुज मागतसे ॥ चरणी ठाव मज देंई ॥ कोठें नव जाय ॥६॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-22T23:56:35.2214768-04:00

Comments | अभिप्राय