HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी तुजविण काय करुं देवराया ॥ मोरया गोसावी सुखे नांदत होतें मी संवसा
मोरया गोसावी - तुझें तुला देतां काय जावे...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



30GOOG
॥ पद ५१ ॥

तुझें तुला देतां काय जावें ॥ प्राण्या नकळें हो कांहीं ॥

लटकाची अहंकार वाढविला ॥ साधी तोचि पापाला ॥

माझें माझें किती ह्मणसी ॥ सर्वही टाकून जासी ॥

अहो जय जय जय गणराज ऊदारा ॥१॥

सकळिक राहिल येथेंची ॥ मग बापुडा होसी ॥

पुत्र हेचि तेथें राहती ॥ तैसि तेचि हो पत्‍नी ॥

यम तुज दंड मारिती ॥ काकुलती हो येसी ॥

अहो जय जय जय गणराज ऊदारा ॥ अहो करुणा कांहीं त्याला नये रे ॥

ऐसें जाणून तेही ॥ आपुलें हित तेहि करावें ॥

मोरयासी भजावें ॥ जप तोहि त्याचा करावा ॥

पापें जाळून टाका ॥ अहो जय०ग०ऊ० ॥३॥

अहो शुद्ध तेचि बापा होऊनी ॥ जांई स्वानंद लोका ॥

ऐसें हित तेचि सांगती ॥ मोरया गोसावी दातार ॥

चला जाऊं पाहुं तयाला ॥ तोचि (हाथी) भेटेल आतां ॥अहो जय०ग०ऊ० ॥४॥

अहो चिंचवडीं तोचि राहिला ॥ चिंतामणीं पाहिला ॥

भेद तोचि नाहीं तयाला ॥ ऐसें कळूनी त्याला ॥

मग सोय धरी देवाची ॥ चिंतामणी चरणाची (पायाची) ॥अहो जय०ग०ऊ० ॥५॥

अहो ह्मणुनियां आवडी लागली ॥ गणराज चरणीं ॥

चिंतामणी तोचि पाहावा ॥ ऐसें धरुनी मनीं ॥

चिंतामणी दास विनवी ॥ भक्ति आपूली द्यावी (सेवा आपूली घ्यावी) ॥अहो जय०ग०ऊ०॥

अहो न्यावें त्वांचि माहेरा ॥अहो जय० गणराज ऊदारा ॥६॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-23T00:02:30.0717264-04:00

Comments | अभिप्राय