HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी कामधेनु  आहो कामधेनु ग मोरया गोसावी चला रे सखयांनो ॥ जाऊं मोर
मोरया गोसावी - न विचारी गुणदोष ॥ लाऊनि क...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



45GOOG
॥ पद ५९ ॥

न विचारी गुणदोष ॥ लाऊनि कासेसीं ॥

उतरीं पैलथडी क्षणमात्रे ॥१॥

अहो भवसागर डोहो ॥ दुस्तर हा जाणा ॥

मोरया गोसावी तारील तेथें ॥२॥

अहो ह्मणोनि आवडी ॥ लागलीसे तूझी ॥

मोरया गोसाव्यावीण नेणें ॥३॥

अहो चिंतामणी देव ॥ पाहे हो नयनीं ।

तेणें सर्व सिद्धि पावतील ॥४॥

अहो ऐशा त्या हो मुर्ती ॥ हृदयीं धरुनी ॥

जप तोही त्याचा करुनियां ॥५॥

अहो चिंतामणी दास ॥ स्मरें नित्य त्याला ॥

आणीक दुसरा देव नेणें ॥६॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-23T00:14:19.6520528-04:00

Comments | अभिप्राय