HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी माझी मयुरपुरी हेचि पंढरी मोरया गोसावी भिमातटीं स्थळ भूमी सिद्धि
मोरया गोसावी - सिद्धटेकवासी हो सिद्धिविन...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



30GOOG
॥ पद ७० ॥

सिद्धटेकवासी हो सिद्धिविनायक ॥

त्रिगुणनायक हो नमीयेला ॥१॥

सिद्धिबुद्धि आई हो अष्टसिद्धि माता ॥

लक्षलाभ भ्राते हो बंधु माझें ॥२॥

भगीनी सतरावी हो माझी भीमरथी ॥

सद्गुरु नांदती हो तयेतीरीं ॥३॥

सत्वगुणी चला हो उंच त्या पर्वतीं ॥

सिद्धनाथ ध्याती हो विष्णु तेथें ॥४॥

महादेव तो रवी हो स्तवीती शिवाई ॥

अखंडित राहीं हो प्राण्या तेथें ॥५॥

भगवंत दास हेंचि हो मागत ॥

जन्मोजन्मीं देंई हो हेंचि मज ॥६॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-23T00:32:31.0213648-04:00

Comments | अभिप्राय