HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी आजि एक धन्य दिवस झाला हो मोरया गोसावी पजा अवसर झाला ॥ विघ्नराज
मोरया गोसावी - पावें पावें एक वेळां ॥ तु...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



30GOOG
॥ लळीत ५ ॥

पावें पावें एक वेळां ॥ तुज विनवितों दयाळा ॥

वाट तुझी पाहातों डोळां ॥ भेटि देंई तूं मजला ॥१॥

ध्यान लागलें लागलें ॥ मन वेधलें वेधलें ॥धृ०॥

तुझिया नामाचा मज भरंवसा ॥ कधीं तुज देखेन विघ्नेशा ॥

देह झाला उतावळा ॥ चरणीं तुझ्या विनटला ॥ध्यान ला० ॥२॥

तूं विघ्नाचा नायकू ॥ होसील विघ्नाचा छेदकू ॥

देव नेणें मी आणिक ॥ दीना कोण सोडविता ॥ध्यान ला० ॥३॥

तूं त्रैलोक्य दाता चिंतामणी ॥ दुजा नेणो त्रिभवनी ॥

विनवी दास चिंतामणी ॥ तुझ्या वेधलों चरणीं ॥

ध्यान लागलें लागलें ॥ मन वेधलें वेधले ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-23T03:28:36.3836096-04:00

Comments | अभिप्राय