HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड आंधळा आधि देखत होतो सकळ । मग ह भारुड अंबा सत्वर पाव गे मला । भवानी
आशीर्वादपत्र - चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...


भारुड - आशीर्वादपत्र Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - आशीर्वादपत्र

चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद ।
पत्र लिहिणे कारण जे तुम्हास देहगावची सनद शंभर वर्षांनी देऊन पाठविले ।
कलम तपसील । गावची आबादी करावी ॥ १ ॥
कामक्रोध हे रयत त्यांचे ऎकू नये । कलम तपसील ॥ २ ॥
आशा मनषा यांची संगत धरू नये ।कलम० ॥ ३ ॥
सदा स्वधर्मे वागणूक ठेवणे ।कलम तपसील ॥ ४ ॥
शांतिक्षमादया असो देणे ।कलम तपसील ॥ ५ ॥
ज्ञान वैराग्य - भजनपूजनी आदर ठेवणे ।कलम तपसील ॥ ६ ॥
ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले । तुम्ही तों ते विसरून सदरींचे कलमास न अनुसरून । वाईट वागणुकीचा रस्ता काढला । तो तुम्हास परिणामी बाधक होईल । सावध रहाणे । एका जनार्दनी शरण । हे आशीर्वादपत्र
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2010-08-31T07:57:39.5386380-04:00

Comments | अभिप्राय