HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
आशीर्वादपत्र चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार भारुड अयोध्येचा हो देव्हारा
भारुड - अंबा - सत्वर पाव गे मला । भवानी ...


भारुड - अंबा Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


45GOOG
भारुड - अंबा

सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥
सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥
जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥
दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥
Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-12T01:19:23.0000000Z

Comments | अभिप्राय