HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड अंबा सत्वर पाव गे मला । भवानी भारुड माझे कुळीची कुळस्वामिनी
भारुड - अयोध्येचा हो देव्हारा


भारुड - अयोध्येचा हो देव्हारा

45GOOG
भारुड - अयोध्येचा हो देव्हारा

अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा ।
डोळे फिरवी गरगरा ॥ १ ॥
मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ धृ. ॥
रामाबाईचा घरचारू । चौघाजणांचा व्यापारू ।
सहा अठराचा पडिभारू ॥ २ ॥
रामाबाईचा वो शेला । ब्रह्म शेटिने विणिला ।
तुजलागी पांघुरविला ॥ ३ ॥
येथोनि जालासे सोहळा । रामाबाईला वोवाळा ।
एका जनार्दनी मुळा ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-06T07:39:12.0000000Z

Comments | अभिप्राय