HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड आम्ही परात्पर भिकारी भारुड चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा
भारुड - चौदेहांची घेऊनी दीक्षा


भारुड - चौदेहांची घेऊनी दीक्षा

30GOOG
भारुड - चौदेहांची घेऊनी दीक्षा

चौदेहांची घेऊनी दीक्षा ।
आम्ही मागू कोरान्न भिक्षा ।
अलक्ष्य अनुलक्ष ।
प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्ष ॥१॥
बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
देही असून होऊ विदेही ।
कामक्रोध बांधू पायी ।
आशा मनिषा करु दिशा दाही ।
मदमत्सर उडवू भाई ॥२॥
प्रपंचाची लावूनी राख ।
तोडू जन्ममरणाचा पांग ।
एका जनार्दनी अनुराग ।
अक्षय संग संताचा ॥३॥
बाळ संतोष बाबा ॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-13T19:51:54.9328272Z

Comments | अभिप्राय