HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड अलक्ष लक्ष पाहवेना भारुड नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी
भारुड - आम्ही परात्पर देशी


भारुड - आम्ही परात्पर देशी

30GOOG
भारुड - आम्ही परात्पर देशी

आम्ही परात्पर देशी ।
कोणी नोळखती आम्हासी ।
टाकून आलो संतापाशी ॥१॥
बाळसंतोष बाबा ॥धृ. ॥
जीर्ण स्वरूपाचा शेला ।
विषय भोगीता विटला ।
तो मज द्याव दाते वहिला ॥२॥
ऎकत्वाचे बिरडे जोडी ।
त्रिगुणासी कसणी फेडी ।
जुनी कांसणी रोकडी ॥३॥
पूर्णत्वाची पुरणपोळी ।
स्नेहावरील तेलवरी ।
प्रबोध लाडू तयावरी ॥४॥
एका जनार्दनी मागतादान ।
जिताची जाण जीवपण ।
शेखी दिले शिवपण ॥५॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-06T07:49:20.0000000Z

Comments | अभिप्राय